संपादकीय: राजकीय भूकंप भाग २

*महत्त्वाचे*

*राजकीय भूकंप – भाग 2*

भाजप-शिवसेनेला पाठिंबा देण्याचा आणि सरकारमध्ये सामील होण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय 2024 च्या आधी विरोधी पक्षांच्या ऐक्याला मोठा धक्का आहे.

शरद पवार यांच्या संमतीशिवाय हा निर्णय होऊ शकला नसता आणि राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते आणि 2024 साठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसने उभे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा निर्णय झाला असावा.

आजचं अजित पवार यांचं बंड (किंवा शिंदे फडवणीस सरकारला पाठिंबा) करण्यास कारण राहुल गांधी आणि शिंदे यांच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देण्याकरीता भाजप ने मोठी खेळी केली… हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीचे कारण असू शकते.

वरिष्ठ पवार बाजूला पडण्याच्या भावनेचे नाट्य करीत असले तरी, ते सार्वजनिकपणे तसे सांगू शकत नाही, अशा प्रकारे कनिष्ठ पवारांना पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारू देत आहे आणि त्यांना पुढे केल्याचं वाटत आहे…

पुढील ७ दिवसांच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर नजर ठेवूया…