
खालापूरजवळील इरसालवाडीमध्ये माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती झाली आहे. (Khalapur Landslide) बुधवारी रात्री इरसाळगड (इरसाळ वाडी) येथे दरड कोसळून ३० ते ४० घरे मलब्याखाली अडकल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
आतापर्यंत २५ लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, या गावात ५० ते ६० घरांची वस्ती असून जवळपास २०० ते ३०० मतदार असल्याचे समजते. मलब्याखाली अंदाजे ३० ते ४० घरातील लोक अडकले आहेत. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता आहे. अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे.






