
मुंबई: काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवन रेखा ठप्प झाली आहे. वाशी ते कुर्ला दरम्यान हार्बर रेल्वे पूर्णपणे बंद असून मध्य रेल्वेचीही सी एस टी ते कुर्ला दरम्यान वाहतूक बंद आहे. कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने रेल्वेची सेवा कोलमडली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.






