
आज 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
विमल फाउंडेशन व प्रगती फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने ( भव्य आरोग्य शिबिराचे ) जुईनगर नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आलं होत. सदर आरोग्य शिबिरास मिलेनियम हॉस्पिटल, सानपाडा व SHHPBS चेंबूर मुंबई यांचे सहकार्य लाभले. प्रबुद्ध सेवा संघाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सन्माननीय माजी खासदार श्री. संजीव नाईक, नवी मुंबई महानगर पालिका माजी महापौर श्री. जयवंत सुतार, सामाजिक कार्यकर्त्या सौं. माधुरी सुतार , सौ सुहासिनी, श्री. राजेश ठाकूर, श्री. वैभव भास्कर, मेधागे मॅडम, समाजसेवक जगदीश पाटील, समाजसेवक विजय साळे, श्री. प्रतीक यादव, श्री. सिद्धार्थ साळवी साहेब, प्रबुद्ध सेवा संघ चे अध्यक्ष श्री पाटील, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील अध्यक्ष श्री. कवडे, प्रगती फौंडेशनच्या कार्यकारी संचालक सौ सिद्धी राणे, श्री राकेश वाणी, सौ उषा पांडे, व त्यांचे सहकारी आणि प्रगती फाउंडेशन व विमल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जुईनगर प्रभागातील स्वच्छता दूत म्हणून कार्यरत असलेले सफाई कामगार यांनी सुद्धा कार्यक्रमांस उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवली.
श्री संजीव नाईक यांनी नवी मुंबई शहराचा मागील दहा वर्षात झालेला विकास आणि भविष्यात होवू घातलेले भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प तसेच नवी मुंबई शहराचे आंतर राष्ट्रीय पातळीवर वाढणारे महत्त्व अधोरेखित केले. श्री संजीव नाईक यांनी नवी मुंबई हे शहर शिक्षण, व्यापार, सामजिक एकता , दळण वळण या सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचे नमूद केले. लवकरच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हिरा बाजार व्यापार केंद्र स्थापन होणार असल्याचे सांगितलं. स्वच्छ भारत स्पर्धेत नवी मुंबई शहराचा प्रथम क्रमांक पटकावण्याचा मनोदय व्यक्त केला. श्री प्रकाश व आकाश ढसाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून प्रगती फौंडेशनच्या श्री किरण राणे यांनी मांडलेल्या Doctor On Wheel या संकल्पनेला पाठिंबा देवून सढळ हस्ते मदत करण्याचे जाहीर केले.

या आरोग्य शिबिरात गणेश नाईक ब्लड बँक या रक्तपेढी च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीरास तरुणांनी मोठया प्रमाणात रक्तदान केले.

मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर यांच्या माध्यमातून BMD टेस्ट सुद्धा ठेवण्यात आली होती.

शिबिरात वर्ल्ड ऑप्टिक च्या माध्यमातून नेत्र तपासणी सेवा आणि मोफत चष्मा ऊपलब्ध करून देण्यात आला. डी वाय पाटील आयुर्वेदिक संस्थेच्या वतीन मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे देण्यात आली.

अवयव दान करण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करून अवयव दान करण्यासाठी जागृता करण्यात आली. न्यू मिलेनियम हॉस्पिटल च्या माध्यमातून ( ECG सेवा, महिला / पुरुष ) CBC, रक्तगट चाचणी इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे विमल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रकाश ढसाळ व सचिव श्री आकाश ढसाळ या ढसाळ बंधुचा आज वाढदिवस आहे. अश्या या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजक विमल फाउंडेशन आणि प्रगती फाउंडेशनचे लोकांनी भरभरून कौतुक केले.
विमल केटरर्स च्या माध्यमातून नाश्ता आणि कार्यकर्त्यांना जेवण उपलब्ध करून देण्यात आलं.
विमल फाउंडेशनचे श्री.प्रकाश ढसाळ व श्री.आकाश ढसाळ आणि प्रगती फाउंडेशनचेचे श्री. किरण राणे व सहयोगी संस्था श्री हरीहरपुत्र भजन समाज यांच्या माध्यमातून रक्तदात्याना आणि कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या आरोग्य सेवक व डॉक्टरना भेट वस्तू देऊन गौरविण्यात देखील आले.







