पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्ला बोल: जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा वापर केला

नवी दिल्ली: कलम हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस समाचार घेतला. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या जनतेचा काय फायदा झाला? याचा कधीच कोणी विचार केला नाही. उलट ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणीच घातल्या गेलं, असं सांगतानाच जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केल्याचा घणाघाती हल्लाही मोदींनी केला. ३७० कलम हटविल्याने सरदार वल्लभभाई पटेल, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं स्वप्नच साकार झाल्याचंही मोदी यांनी सांगितलं.