रेपा दरात घट; ई एम आय होणार कमी

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने ईएमआय घटणार आहे. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने (MPC) बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला. ही आरबीआयने केलेली सलग चौथी कपात आहे. आता यामुळे कर्ज फेडणाऱ्यासाठी कमी हफ्ता बसणार आहे आणि कर्ज स्वस्त होणार आहे.