उदयनराजे अखेर भाजपमध्ये

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,’ असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.

नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मोदी व शहांची तोंडभरून स्तुती केली.