
नवी मुंबई : जुईनगर मध्ये गणेशोत्सव देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याकरिता विजेत्या स्पर्धकास पाहिले बक्षीस चांदीचा मोदक, दुसरे बक्षीस चांदीचा मोदक असे ठेवण्यात आले होते.
एकूण 214 गणेशोत्सव मंडळ व स्पर्धकानेे सहभाग नोंदवला. स्वामी सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या देखव्याला पाहिले पारितोषिक देण्यात आले स्वामी सोसायटी च्या व्यतीने तरुण मुलांनी नवी मुंबई प्रतिकृती आणि स्वच्छ नवी मुंबईचा संकल्प. असे संदेश देणारे छाया चलचित्र चे दर्शन घडवले होते त्या मध्ये भाग घेणारे मुले
राहुल जाधव, प्रणव पाटील , संतोष शिवदास, संकेत बोडके व स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळाच्या माध्यमातून देखावा सादर करण्यात आला होता.

दुसऱ्या क्रं शिवप्रेरणा सोसायटी शिवप्रेरणा सोसायटी, जुईनगर (मोरया मित्र मंडळ) याांनी पटकावला.
यंदा गणेशोत्सवात चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून देव गणपतीचे मनोगत भक्त मंडळीं समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लोकमान्य तिळक ह्यानी स्वतंत्र्य पुर्व काळात सुरु झालेला गणेशोत्सव व आज गणेशोत्सवचे स्वरुप ह्या फरका मधून समाजामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जागृती होण्याकरिता एक छोटासा प्रयत्न केला आहे.
हा प्रयत्न यशस्वी करणारे आशुतोष सनस, विजय दुभळकर, प्रमोद भुजबळ, गणेश लाड, प्रविण सोनवणे व मित्र मंडळ
श्री मा गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या मंडळाना चांदीचा मोदक पारितोषिक म्हणून देण्यात आला .
या स्पर्धेचे आयोजन श्री विजय बाबासाहेब साळे ( ‘ब’ प्रभाग समिती सदस्य ) यांनी केले होते व त्यांचे सहकारी श्री रणजित भोगवल, तानाजी कदम, प्रकाश पवार,पांडुरंग नलावडे , राजेंद्र बोडके,यांनी या स्पर्धेत सहभागी मंडळीना भेट देऊन देखाव्याचे छायाचित्रे घेतली होती.







