
मुंबई : बेस्ट उपक्रम मुंबई पालिकेकडून मिळालेल्या आर्थिक निधीतून सावरत आहे. नवीन बस घेतानाच तिकीट कपातीचाही निर्णय अंमलात आणला आहे. त्यापाठोपाठ बेस्टमधील सुमारे ४१ हजार कामगारांना यंदाची दिवाळी गोड जावी म्हणून ९१०० रु. बोनस जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून तोटा सहन करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने आर्थिक परिस्थिती बदलताच शुक्रवारी बोनसचा निर्णय घेतला आहे.
यंदा कोणत्याही संघर्षाशिवाय बोनस मिळणार आहे. बेस्ट प्रशासनाने कामगारांना ९१०० रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच बेस्ट समितीची मंजुरी घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.






