
नवी दिल्लीः भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती चॅम्पियनशीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ६५ किलोच्या वजनी गटात खेळताना बजरंग पुनियाने हे यश मिळवले आहे. मंगोलियाच्या कुस्तीपटूवर ८-७ अशी मात करीत बजरंगने सेमीफायनलमधील पराभवाचा वचपा काढला.
जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपच्या क्वार्टर फायनलमधील या विजयाबरोबरच बजरंग पुनियाने पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.











