
वैभववाडी : .प.शाळा परबवाडा नं.१चे उपशिक्षक श्री.रामचंद्र धोंडी झोरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर महाराष्ट्र इंडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्या शिक्षकांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.यावर्षी श्री.रामचंद्र धोंडी झोरे यांनी आपल्या सेवाकाळात शिष्यवृत्ती परीक्षा,इतर स्पर्धा परीक्षा,क्रिडा स्पर्धा,लोकसहभागातून शाळेचा विकास,विविध शैक्षणिक उपक्रम,तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार श्री.श्रीपादजी नाईक आरोग्य मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते व संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यसभागृह इन्स्टिट्यूट मिनीझीस ब्रगांजा पणजी गोवा येथे प्रदान करण्यात आला.
श्री.रामचंद्र धोंडी झोरे यांच्या सेवेची सुरवात जि.प.शाळा तुळसवडखोल या दुर्गम भागात झाली.तेथे त्यांनी शिष्यवृत्ती जादा वर्ग घेऊन मार्गदर्शन केल्यामुळे सलग आठ वर्षे ४थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १००% व अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले व लोकसहभागातून भौतिक सुविधा निर्माण केल्या.त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत तुळसने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.










