अजित पवारांचा अज्ञातवास संपला: 3.30 वाजता घेणार पत्रकार परिषद

मुंबई: आमदारकीचा राजीनामा नाट्यानंतर अज्ञातवासात गेलेले राष्ट्रवादीचे अजित पवार आज प्रकट झाले. मुंबईत शरद पवार आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर बैठक घेऊन झाल्यानंतर अजित पवार राजीनामा बद्द्ल 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन कारण स्पष्ट करणार आहेत. आज शरद पवारांनी बैठक कौटुंबिक होती, राजकीय नव्हती असे स्पष्ट केले. राजीनामा बद्द्ल अजित पवार स्वतः सांगतील असे पवार म्हणाले.

अजित पवार यांची पत्रकार परिषद मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे होणार आहे. आता सर्वांचं लक्ष अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.