अजित पवार यांच्या राजीनाम्याचे गूढ उकलले, पत्रकार परिषदेत सांगितले कारण

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती

मुंबई : मुंबईतील वाय. बी. सेंटर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा नाट्याबद्दल सांगितले. सुरुवातीला सर्व कार्यकर्त्यांची माफी मागितली कारण कोणालाही न सांगता राजीनामा दिला. कुटुंबातील कोणालाही न सांगता राजीनामा दिला, राजीनाम्याचा विचार अनेक दिवसांपासून होती. राजीनामा दिल्यामुळे हितचिंतक भावूक ती चूक होती की नाही मला माहित नाही, असे पुढे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी नंतर शिखर बँकेच्या कामकाजा बाबत आणि कार्यपद्धतीबाबत विश्लेषण केले. काही वेळा बँक सुरु ठेवण्यासाठी नियम डावलून काम करावे लागते. सहकारी कारखान्यांना मदत करण्याचा निर्णय सामूहिक होता. शिखर बँकेत अनेक दिग्गज होते. शिखर बँक 285 कोटी नफ्यात आहे. कर्ज वाटले आहेत ते फिटलेही आहेत. याप्रकरणी शरद पवारांचा काहीच संबंध नाही तरी देखील ते माझे काका म्हणूनच त्यांचे नाव गोवले गेले. माझ्यामुळे साहेबांची (शरद पवार) बदनामी झाली त्याचा खूप त्रास मला झाला असे अजित पवार यांनी सांगितले. बँकेची 12000 कोटींची ठेवी तर भ्रष्टाचार 25000 कोटींचा कसा असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ईडीची नोटीस आताच का आली? असाही प्रश्न उपस्थित केला. आमच्या कुटुंबात कसलेही वाद नाही कोणताही गृह कलह नाही , पवार सांगतात ते ऐकतो हे त्रिवार सत्य. आम्हाला अनेक जण सोडून गेले पण केव्हाही त्यांच्यावर टीका केली नाही. कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो असू म्हणून जवळचे सोडून गेले. मी पक्षासोबत आहे. असेही पवारांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांना माझ्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मी राजीनामा दिला हेच खरे आहे.

पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले व त्यांना अश्रु अनावर झाले.