शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

दोन दिवसात युतीच्या जागावाटपाची घोषणा

मुंबई: वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मतदार संघातील इच्छुक, जिल्हा पदाधिकारी, नेते यांची बैठक घेतली. या बैठकीत एक ना एक दिवस मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसविल्याशिवाय राहणार नाही असे वचन मी बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. ते पूर्ण करणारच असा निर्धार व्यक्त करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘युती आहेच, एक दोन दिवसात जागा वाटपाची घोषणा होईल’ असे शनिवारीजाहीर केले. शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांनी भागाव्याशी इमान राखावे व एकमेकांच्या मतदार संघात युतीच्या उमेदवारासाठी काम करावे असे आवाहन केले.