
नवी दिल्ली: दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी आज नशामुक्तीपासून प्लास्टिकमुक्तीपर्यंतचं आवाहन केलं. देशवासियांना दसरा, दिवाळी असा सणवारांच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना सांगितलं की सणवारांचा खरा आनंद वंचित लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आणणं. त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यात आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशवासियांनी ‘भारताची लक्ष्मी’ अभियान चालवावे, असं आवाहन मोदींनी केलं. ‘भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करू शकता, असं ते म्हणाले. तसेच मोदींनी तरुणांना तंबाखू, ई-सिगारेट सोडण्याचं आवाहन केलं.






