वरळी विधानसभा मतदारसंघातूनही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार – अजित पवार

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. येत्या २ ऑक्टोबर रोजी आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. आमच्या आघाडीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टी, आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी त्याबाबत बोलणंही सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले. तसेच वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेना-भाजपचे नाराज आमच्या संपर्कात आहेत. दोन दिवस थांबा, सर्व चित्रं स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.