सुप्रसिद्ध अभिनेते विजू खोटे यांचे निधन

मुंबई: ”शोले” चित्रपटातील सुप्रसिद्ध ‘कालिया’ या नावाने प्रकाश झोतात आलेले आणि जवळपास 300हून अधिक सिनेमात काम केलेले सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते.

विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या.