
कणकवली : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो स्वीकारला आहे. वडील व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे भाजपमध्ये जात असल्याने नितेश यांनीही पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (2 ऑक्टोबर) दोन्ही जणांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा होऊ शकतो. कणकवली मतदारसंघातून नितेश यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.






