
मुंबई: विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असे म्हणता म्हणता, कार्यकर्त्यांच्या दबावापुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज उमेदवारी यादी जाहीर करावी लागली. मनसेने २७ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांचाही समावेश आहे.


मंत्रालयात विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यासह मनसेने २७ जणांची यादी जाहीर केली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे.






