‘वॉर’ चा बॉक्सऑफिस वर धमाका; पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

मुंबई: हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ या जोडगोळीच्या ‘वॉर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एंट्रीलाच जोरदार मुसंडी मारली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 

एकाचवेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तिन्ही भाषांमधील सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन ५३.३५ कोटी इतकं आहे. 

याआधी आमीर खानच्या ठग्ज ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या नावावर होता. या चित्रपटाने ओपनिंगला ५०.७५ कोटींची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर वीकेंडला हा सिनेमा आणखी विक्रमी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

Source: Crazy 4 Bollywood