
मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप 2019 साठी यंदा इंग्लंडमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघही यंदा वर्ल्ड कप विजेतासाठी मजबूत दावेदार आहे. भारतीय संघात यंदा गोलंदाजीत विविधता आहे आणि एक हाती सामना जिंकून देणारे गोलंदाज आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवान गोलंदाजी हे भारतीय संघाची जमेची बाजू आहे खास करून जसप्रीत बूमराह सारखा गोलंदाज भारतीय संघात आहे. विराट कोहली सारखा आक्रमक कप्तान आणि धुरंधर धोनीची साथ यामुळे भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी मजबूत दावेदार मानला जात आहे. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली असून, संघ आज मुंबईहुन इंग्लडला रवाना झाला. क्रिकेटचा हा महाकुम्भमेळा जवळपास दीड ते दोन महीने चालणार असून पहिला सामना 30 मे रोजी इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिका विरूध होणार आहे. अंतिम सामना 14 जुलै रोजी होणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने ख़ेळणार आहे. हे सराव सामने न्युझीलंड आणि बांगलादेश यांच्या विरूध होणार आहेत.











