राजगर्जना: सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्याकडे आलोय

मुंबई: राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पावसामुळे रद्द करावी लागली असली तरी आजपासून मुंबईतून राज यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत खालील मुद्यानां हात घातला आणि सत्ताधारी सेना-भाजपा पक्षावर जोरदार टीका केली.

√काश्मीरचे कलम ३७० हटवले अभिनंदन; पण त्याचा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय?

√मेट्रो कारशेड कुलाब्यात का नाही? आरेची झाडे का तोडताय

√रोजगाराच्या मुद्यावर जनतेत चिंतेचे वातावरण

√आरे वृक्षतोडीवरून राज ठाकरे यांची शिवसेनेवर टीका

√बँकांचे घोटाळे होत आहेत. ग्राहक बँकांबाहेर रडतात; पीएमसी बँकेचे संचालक भाजपशी संबंधित

√शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे.

√शिवसेना फक्त राजीनामा देण्याची घोषणा करते, करत तर काहीच नाही

√शिवसेना तीस वर्षे युतीत सडली आणि124 वर अडली

अशा अनेक मुद्यावर राज ठाकरे यांनी आपले परखड मत मांडले आणि मनसेचा प्रचाराचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. माझ्या मागे ईडीची चौकशी लावली तरी मी गप्प बसणार नाही. तसेच राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे. मला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्याकडे आलोय असे राज ठाकरे म्हणाले.