बंडखोरी भोवणार; सेना-भाजपाला फटका बसणार?

मुंबई: राज्यात ५० मतदारसंघात १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना-भाजप महायुतीला बसला आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काही बंडखोरांना थोपविण्यात शिवसेना-भाजपला यश आले असले तरी एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील ३० जागांवर युतीला बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईतील तीन जागांचाही समावेश आहे.