
कल्याण: एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या दलबदलू उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत घरी बसवा. आपल्या हतबलतेबद्दल मनात जरादेखील चीड असेल तर ती मतपेटीतून व्यक्त करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या. नोकऱ्या नाहीत, लोकांना कामावरून काढून टाकताहेत, राज्यातले, देशातले उद्योग बंद होताहेत. सरकारी नोकरही नोकऱ्या गमावत आहेत, भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भिवंडी येथील प्रचारसभेत केला.






