मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सने यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ अब्ज डॉलर (३.५ लाख कोटी रुपये) आहे. तर गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५.७ अब्ज डॉलर (१.१० लाख कोटी) रुपये इतकी आहे.

फोर्ब्सच्या यादीतील ‘टॉप १०’

१) मुकेश अंबानी – एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी)
२) गौतम अदानी – एकूण संपत्ती (१.१० लाख कोटी)
३) हिंदुजा ब्रदर्स – एकूण संपत्ती (१.०९ लाख कोटी)
४) पालोनजी मिस्त्री – एकूण संपत्ती (१.०५ लाख कोटी)
५) उदय कोटक – एकूण संपत्ती (१.०२ लाख कोटी)
६) शिव नादर – एकूण संपत्ती (१.००८ लाख कोटी)
७) राधाकृष्ण दमानी – एकूण संपत्ती (१.००१ लाख कोटी)
८) गोदरेज फॅमिली – एकूण संपत्ती (८४००० कोटी)
९) लक्ष्मी मित्तल – एकूण संपत्ती (७३५०० कोटी)
१०) कुमारमंगलम बिरला – एकूण संपत्ती (६७२०० कोटी)