शरद पवार यांची बार्शी मध्ये जोरदार प्रचार सभा

सोलापूर: सोलापुरातील बार्शी इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शरद पवार बोलत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आज आपला वचननामा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत भोजन देण्याचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. हाच धागा पकडून पवार यांनी आपल्या खास शैलीत शिवसेनेवर हल्लाबोल केला. ‘युतीचं सरकार असताना शिवसेनेनं १ रुपयांत झुणका-भाकर ही योजना सुरू केली होती. मात्र, ही योजना कधी बंद झाली ते कळलंही नाही,’ असं पवार म्हणाले. तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक करायचा नाही,’ असा सणसणीत टोला पवार यांनी शिवसेनेला हाणला आहे.

कलम ३७० रद्द करण्याला आमचा पाठिंबाच आहे. मात्र, त्यांचा विनाकारण जप सुरू आहे. ३७० कलमावरून ओरडणारे ३७१ कलमावर गप्प का?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सत्तेवर आल्यानंतर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करू, असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. पण समुद्रात एक वीटही उभी राहिली नाही. असे पवार यांनी सांगितले.