दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे: फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा ९ विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होणार आहे.बारावीची परीक्षा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन बुधवार दि. १८ मार्च २०२० रोजी संपणार आहे तर दहावीची परीक्षा मंगळवार दि. ३ मार्च २०२० रोजी सुरू होऊन सोमवार दि. २३ मार्च रोजी संपणार आहे. या दोन्ही परिक्षांचं दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर आजपासून उपलब्ध करून देण्यात आलं आहे.