
जम्मू कश्मीर- भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.

दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

एएनआयनं लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत माहिती दिली आहे.






