रामजन्मभूमी खटला सुनावणी पूर्ण; प्रतीक्षा निकालाची

नवी दिल्ली: सुमारे दोनशे वर्षे जुने प्रकरण रामजन्मभूमी विवाद प्रकरण खटला सुनावणी आज पूर्ण झाली. मंदिर आणि मस्जिद या दोन्हीही पक्षकारांची बाजू ऐकून रामजन्मभूमी विवादित जमीन प्रकरणी निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान सरकारने अयोध्येत 145 कलम लागू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निकाल 8नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर च्या दरम्यान लागू शकतो. मंदिर आणि मस्जिद काय होणार? राम की अल्ला ? की, रामल्ला हे नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल. हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीही पक्षकारांना निकालाची प्रतीक्षा आहे.