
नवी दिल्ली: पीएमसी बँक प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेण्यासाठी नकार दिला आहे. भारतीय रिजर्व बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध दाखल केल्याने लाखो खातेदार अडचणीत सापडले आहेत. बँक खातेदारांचे लाखो रुपये खात्यात अडकून पडले आहेत. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात याचिका दाखल करून घेण्यास नकार दिल्याने पीएमसी बँक खातेदारांना जोरदार झटका बसला आहे.










