पुण्यात परत धो धो

पुणे: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुण्यात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.

आता पुन्हा मुसळधार पाऊस शहरात कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी दिवसभर शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदानासाठी तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मतदानाच्या दिवशी पावसाने दिवसभर विश्रांती घेतली. सोमवारी रात्री मात्र जोरदार पाऊस शहरात सुरू झाला. आज दिवसभर पाऊस नसला तरी आता मुसळधार पाऊस शहराच्या सर्वच ठिकाणी कोसळत आहे. दरम्यान पुढील 48 तास अधूनमधून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बहुतेक पावसाने यंदा दसऱ्यानंतर दिवाळी सुद्धा साजरी करायची ठरवलं दिसतं असं लोकं विनोदाने म्हणू लागलेत.