मराठी चित्रपट थिएटरसाठी मनसे करणार खळळखट्याक

मुंबई: दिवाळीचा मुहूर्तावर बॉलीवूड चित्रपटांची जंत्री आहे. यामध्ये प्रामुख्याने अक्षय कुमार याचा हाऊसफुल्ल4 प्रदर्शित होत आहे त्यामुळे मराठी चित्रपट ‘ट्रिपल सीट’ आणि ‘हिरकणी’ यांना थिएटर मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटांना थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला आहे.

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात थिएटर मिळणार नसतील, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही असेच म्हणावे लागेल. मग खळ्ळखट्याक करूनच थिएटर मालकांचे डोळे उघडणार असतील तर ते करू, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले.