
मुंबई: महाराष्ट्रात आज विधानसभेचे निकाल लागले आणि कोणाचे सरकार सत्तेवर येईल हे स्पष्ट झाले. महायुतीला जरी 160 असे बहुमत जरी असले तरी शिवसेनेने फिफ्टी फीफ्टीची आठवण करून देऊन भाजपाला कैचीत पकडलं आहे. बैठकीनंतर अनेक पर्याय उपलब्ध होवू शकतात असे बोलून आपणच किंग मेकर असणार असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे छगन भुजबळ यांनी राजकारणात काहीही होवू शकते, कदाचित शिवसेनेचा मुख्यमंत्री होवू शकतो. दरम्यान ठाकरे घराण्यातील पहिले आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी मान मिळविला आहे. भुजबळ यांनी, त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे की उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेने ठरवायचे आहे असे बोलून गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकट्या शरद पवार यांच्या जोरावर शानदार कामगिरी बजावली आहे , त्यामानाने काँग्रेस कमी पडली असे सध्याचे चित्र आहे. दरम्यान आयाराम गयाराममुळे भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसला. यामुळे बंडखोरीचा सामना करावा लागला आणि 36 जागांवर आयाराम यांना तिकीट दिलं गेलं त्यापैकी 19 जणांना पराभव पत्करावा लागला यामध्ये भाजपाचे 8 तर शिवसेनेचे 11 जणांचा समावेश आहे. याबाबत अधिक चित्र लवकरच स्पष्ट होईल.






