हरयाणात कोणालाच स्पष्ट बहुमत नाही; योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांचा पराभव, भाजपाचा सरकार स्थापनेचा दावा

चंदीगड: हरयाणात पुन्हा एकदा भाजपचं स्पष्ट बहुमतातील सरकार विराजमान होईल, असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज साफ चुकीचा ठरताना दिसला. हरयाणात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. बहुमतासाठी ४६ हा जादुई आकडा असून सर्वाधिक ४० जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस- ३०, जननायक जनता पक्ष- १०, आयएनएलडी- १ आणि अन्य-९ असं संख्याबळ आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे सत्तास्थापनेचा दावा करणार असून त्यांनी राज्यपालांची वेळही मागितली आहे. दुसरीकडे भाजपने जुळवाजुळव सुरू केली असून दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.