शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे कधीच आश्वासन दिले नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई : पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युला नुसार भाजपाने शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद असे कधीच आश्वासन दिले नव्हते बोलून मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपण स्वत: अमित शहा यांना फोन करून असे आश्वासन शिवसेनेला दिले का, असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे शहा यांनी म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेच्या संबंधांमधील दरी आणखी वाढली असून आता शिवेसनेची प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.