प्रगती फौंडेशन मार्फत पालघर मधील आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी

पालघर : पालघर जिल्ह्यातील बराच भाग हा आदिवासीभागात येतो. येथील दुर्गम भागात ना वीज, ना रस्ते तर ना धड शाळा आहेत. यामुळे येथील बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. पालघर जिल्ह्यातील अशाच एका दुर्गम भागातील दादर कोपरा गावात प्रगती फौंडेशनच्या वतीने आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. येथील दुर्गम भागातील मुलांना इंडिया बुल फौंडेशनच्या सहकार्याने पौष्टिक आहार पावडर पॅकेट तसेच हरी हर पुत्र भजन समाज संस्थेच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य दिवाळी भेट म्हणून देण्यात आले.

या प्रसंगी प्रगती फौंडेशनची स्वयंसेवक टीम प्रणय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होती. सर्व विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिवाळी भेट वस्तू मिळाल्यानंतर समाधानाचे हास्य आणि हावभाव पाहायला मिळत होते. प्रगती फौंडेशनच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याविषयी अधिक वाचा facebook live var https://m.facebook.com/story.php?story_fbid=2951985541497386&id=286699648026002

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2951985541497386&id=286699648026002

Palghar: Celebrated DIWALI FESTIVAL with Underprivileged area of children in the Palghar District.
Diwali Festival was celebrated by Pragatee Foundation’s team at Palghar. Dadar Kopra village in Palghar district which is known for its tribal hilly area where number of population is from the underprivileged categories. There is no power, there is no roads and no facilities for a higher education. We Pragatee Foundation celebrated Diwali by distributing various gifts to the underprivileged children. The event was organised by PRAGATEE FOUNDATION and powered by Shree Harihar Putra Bhajan Samaj and India Bull Foundation. Mr. Pranay Dhamal from the Pragatee Foundation was an official coordinator for this event. Thank you everyone those who were supported and devoted their time and effort. . .