
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची एकमुखाने निवड करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव जयंत पाटील यांनी ठेवला व सर्वानुमते अजित पवार यांच्या नावाला सहमती देण्यात आली. आपण सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू व जनतेचे प्रश्न सोडवू असे सांगितले.






