दहावीचे अर्ज भरण्यास मुदत वाढ

मुंबई: महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरून घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह 20 नोव्हेंबर तर लेट फीस सहित 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शिक्षक संघटनांनी अर्ज भरण्याची मुदत वाढवून मागितल्यान मंडळाने अर्ज भरण्यास मुदत वाढ दिली आहे.