सत्ता स्थापनेसाठी भाजपाची असमर्थता

मुंबई: भाजपा सरकार स्थापन करणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते परंतु आज दिवसभर कोअर कमिटीच्या बैठका घेवून संध्याकाळी उशिरा बहुमत नसल्याने भाजपा सरकार स्थापन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

तब्बल १८ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर आज अखेर भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जनादेशाचा अनादर करत आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं नाही. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि गिरीश महाजन आदी नेते राज्यपालांच्या भेटीला राजभवनात आले. त्यानंतर राजभवनाच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं. राज्यपालांना भेटायला येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला सामोरे न गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

त्यानंतर राजभवनाच्या परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सरकार स्थापन करणार नसल्याचं स्पष्ट केलं. भाजप-शिवसेनेने महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकीला समोरे गेले होते. मतदारांनीही महायुतीलाच कौल दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला नव्याने सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. मात्र एकत्र लढूनही शिवसेना आमच्यासोबत सत्तास्थापन्यास उत्सुक नाही. शिवसेनेला आमच्यासोबत यायचं नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. जनादेश असूनही शिवसेनेने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यांनी जनादेशाचा आदर केला. त्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलं