सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भाजपाला आमंत्रण देणार

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरावडा उलटून गेला तरी सत्ता स्थापन करण्यासाठी कोणताही पक्ष अजूनपर्यंत पुढे आला नव्हता. निवडणूक निकालाच्या आधी भाजपा व शिवसेनेची युती होती आणि या युतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्री पदावर कोंडी न फुटल्याने कोणीही सत्ता स्थापनेसाठी पुढे आले नाही. आज राज्यपाल आता सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 11 नोव्हेंबर ला आमंत्रण देणार असल्याचे कळते. 11 नोव्हेंबर ला राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणार आहेत.