
मुंबई: महाराष्ट्र राज्य सत्ता स्थापनेचा दावा आता अंतिम टप्प्यात पोहचला असून अपेक्षेप्रमाणे आघाडीच्या पाठिंब्याने शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात आता नवीन आघाडी जन्माला आली असून ‘महाशिवघाडी’ नावाने सरकार स्थापन करण्यात येणार आहे. वीस वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच आधीच होकार मिळाला होता परंतु मुख्य लक्ष होतं ते सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या भूमिकेचं. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील स्थिती बद्द्ल माहिती देऊन आजच्या परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा का द्यावा हे समाजविण्यात यश मिळवले आणि मग सेनेच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत छातीत दुखू लागल्याने लीलावती इस्पितळात दाखल झाले आहेत आणि म्हणून सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी राजभवनावावर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे इतर ज्येष्ठ नेत्यांसह दाखल झाले आहेत.






