सत्तेचा पेच वाढविणार काँग्रेसचे पत्रक; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? राज्यपालांकडून तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण

मुंबई: तीन तासात सत्ता समीकरण नाट्याला परत एकदा वेगळं वळण लागले आहे. राज्यपालांनी शिवसेनेला अधिकची वेळ वाढवून दिलेली नाही. काँग्रेसचे खरगे यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उद्या सकाळी चर्चा करून निर्णय घेवू अशी भूमिका घेतली आहे आणि शिवसेनेची कोंडी झाली आहे. काँग्रेसच्या तीन तासाच्या बैठकीत शिवसेनेबाबत निर्णय होवू शकला नाही. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवसेना मात्र कोंडीत सापडली आहे. कारण मुदतीपूर्वी शिवसेनेला पाठिंब्याच पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यपालांना देऊ शकले नाही. दरम्यान राज्यपालांनी आता सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निमंत्रण दिले आहे. जर का राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपालांना होकार देऊ शकले नाही तर मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होवू शकते. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते. दरम्यान 24 तासात सत्ता स्थापन करण्यासासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने शिवसेनेचा गेम फसला असं म्हणावं लागेल. कदाचित आघाडीच सरकार स्थापन करून शिवसेनेकडून पाठिंबा मिळवणार काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा चोवीस तासांचा अवधी देण्यात आला आहे.