
मुंबई: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापन होण्यासाठी जवळपास निश्चित झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरविण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिन्ही पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी सत्तेत सहभागी व्हावे असा प्रस्ताव ठेवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अडीच वर्षे मुख्यमंत्री असा प्रस्ताव तयार केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजापाकडूनही माझ्याशी संपर्क सुरु आहे असे विधान केले आहे. तिन्ही पक्ष माझ्या संपर्कात असून असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात सस्पेन्स कायम आहे. पिक्चर अभी बाकी है!






