देशात मुंबईचं पाणी सर्वात शुद्ध

नवी दिल्ली: देशात वीस शहरातील पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये मुंबईचं पाणी शुद्धतेच्या बाबतेत अव्वल ठरलं आहे. द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड च्या अहवालानुसार देशातील वीस शहरातील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यातपासणीत मुंबईचे पाणी सर्वात शुद्ध पाणी म्हणून अव्वल ठरलं आहे. पाण्याच्या शुद्धतेच्या बाबतीत मुंबई नंबर एक, तर हैदराबाद नंबर दोन आणि भुवनेश्वर नंबर तीन वर आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशाची राजधानी पाण्याच्या शुद्धतेच्या बाबतीत सर्वात शेवटी आहे. हवेच्या शुद्धतेप्रमाणे पाण्याच्या शुद्धतेतीतही दिल्ली खालच्या क्रमांकावर आहे. याबाबतीत मात्र मुंबई महानगर पालिकेला शाबासकी द्यायला हवी.