
मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आज असल्याने शिवतीर्थावर सर्वपक्षीय नेत्यांची त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रीघ लागली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातील सदस्य सोबत शिवतीर्थावर येवून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते यांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थ वर येवून आदरांजली वाहिली. राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्ता समीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनतापक्षाव्यतिरिक्त शिवसेनेचे नवे मित्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेबांच्या सृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहिली.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांच्या घोषणा दिल्या. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेली फुलांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली वाहिली. आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील स्मृतिस्थळी दाखल झाले होते.






