
पुणे: संत नामदेव महाराजांची पालखी घेऊन जाणारी गीदिंडी पंढरपूर ते आळंदी अशी जात होती. आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. ही दिंडी दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करते. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यूझाला, तर १५ वारकरी जखमी झाले आहेत.






