दिल्लीत पवारांचं गुगली: सत्ता स्थापनेचं भाजपा-सेना बघून घेईल

नवी दिल्ली: काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सरकार स्थापनेचं शिवसेना-भाजपला विचारा असं सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचं पवार यांनी सांगितलं. 

दिल्लीत आल्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्याशी सत्ता स्थापनेसाठी चर्चा झाली नाही तसेच सत्ता स्थापनेचं सेना भाजपा बघून घेईल अशी गुगली टाकून सेनेसह सर्वानाच संभ्रमात टाकले आहे.