
नवी दिल्ली: व्होडाफोनसह भारती एअरटेल व रिलायन्स जिओनेही रविवारी दरवाढीची घोषणा केली. सुधारित दरपत्रकानुसार एअरटेलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. एअरटेलकडूनही अन्य नेटवर्कच्या कॉलसाठी प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जाणार आहेत. एअरटेलचा वर्षभर वैध असलेला सध्याचा १,६९९ रुपयांचा अमर्यादित प्लॅन आता २,३९८ रुपयांना उपलब्ध होईल. तर, सध्या ४५८ रुपयांत मिळणाऱ्या ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना ५९८ रुपये मोजावे लागतील. ‘अमर्यादित श्रेणीतील प्लॅन निवडणाऱ्या आमच्या ग्राहकांना सध्याच्या प्लॅनच्या तुलनेत (वेगवेगगळ्या प्लॅननुसार) दररोज ५० पैसे ते २.८५ रुपये अधिक द्यावे लागतील. त्याचवेळी त्यांना अधिकचा डेटाही मिळेल,’ असे ‘एअरटेल’च्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे नवे दर सहा डिसेंबरपासून लागू होणार असून ही दरवाढ ४० टक्क्यांपर्यंत असेल.






