पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय हलचल

मुंबई: पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट शनिवारी व्हायरल झाली होती. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पंकजाच्या या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात असतानाच आज सकाळी पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा उल्लेख गायब आहे. यापूर्वी पंकजा यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये त्यांच्या मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता मात्र भाजप नेत्या किंवा भाजप संदर्भातला कोणताही उल्लेख त्यांनी अकाउंटवर ठेवलेला नाही. कव्हरपेजवर जनतेला अभिवादन करणारा त्यांचा फोटो आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं छायाचित्र आहे.

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पकंजा यांना पराभवाचा धक्का बसल्याने आता पुढची रणनीती काय?, यासंबंधी त्या १२ डिसेंबर म्हणजेच वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळातील सर्वांना या दिवसाची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, पंकजा शिवसेनेच्या दिशेने जाणार की राष्ट्रीय समाज पक्ष या महादेव जानकर यांच्या पक्षात सामील होणार याबाबतच्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2626375727447972&id=147552098663693

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2626375727447972&id=147552098663693