आरे कार शेड पाठोपाठ नाणार प्रकल्प विरोधातील अंदोलकावरील गुन्हेही मागे – मुख्यमंत्री

मुंबई: आरे कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश आज दिले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आज त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत.